चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुलांच्या भांडणाच्या कारणावरून तालुक्यातील एका गावातील ४० वर्षीय विवाहितेला मारहाण करून विनयभंग केल्याचा घटना घडली आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील एका गावात ४० वर्षीय महिला ह्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्यांच्या मुलासोबत एकाचा वाद झाला होता. ३१ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास महिला व तिचे पती घरी असताना गावातील रवींद्र निवृत्ती कुमावत हा लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून विवाहितेच्या घरी आला व शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर शिवीगाळ का करतो असा जाब विचारला आला रागातून निवृत्ती याने चापटा बुक्क्यांनी मारहाण केली व महिलेचा साडीचा पदर ओढून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. यात महिलेच्या गळ्यातील होत तोडून नुकसान झाले आहे. याबाबत महिलेने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी रवींद्र निवृत्ती कुमावत याच्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.