जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बहिणाबाई कॉलनी येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी साकेगाव येथे पाच लाखांची मागणी करत शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार सोमवारी १७ जून रोजी समोर आला आहे. याप्रकरणी दुपारी ३ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील बहिणाबाई कॉलनीतील माहेर असलेल्या पुजा पवन पाटील यांचा विवाह भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील पवन ज्ञानेश्वर पाटील यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर विवाहितेला पैसांसाठी टोमणे मारणं सुरू केलं. माहेराहून ५ लाखांची मागणी केली. विवाहितेने पैसे आणले नाही म्हणून तिला मारहाण करण्यास सुरूवात केली.तसेच सासू आणि नणंद यांनी देखील शारिरीक व मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी सोमवारी १७ जून रोजी दुपारी ३ वाजता शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती पवन ज्ञानेश्वर पाटील, सासू मनिषा ज्ञानेश्वर पाटील आणि नणंद ऐश्वर्या प्रशांत पाटील सर्व रा. साकेगाव ता. भुसावळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.