Home क्राईम माहेरून पैसे आणावे म्हणून विवाहितेचा छळ

माहेरून पैसे आणावे म्हणून विवाहितेचा छळ

0
24
mahila

जळगाव प्रतिनिधी । माहेरून पैसे आणावे म्हणून नेहरू नगरातील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, जळगाव शहरातील नेहरू नगर येथील माहेर असलेल्या जयश्री निलेश मोरे (वय-२९) यांचा विवाह निलेश सुधाकर मोरे रा. मुंबई यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर पती निलेश याने पैश्यांची मागणी करून लागला. त्याला नकार दिल्याने विवाहिला शारिरीक व मानसिक छळ देण्यास सुरूवात केली. त्यानंतर सासू, जेठ व जेठाणी यांनी संगनमताने विवाहितेला २४ ऑक्टोबर २०२१ रोजी घरातून हाकलून दिले.

याप्रकरणी विवाहितेने एमआयडीसी पोलीसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून ६ जानेवारी रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती निलेश सुधाकर मोरे, सासु आशा सुधाकर मोरे, जेठ प्रशांत सुधाकर मोरे, जेठाणी काजल प्रशांत मोरे सर्व रा. मुंबई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहे.

 


Protected Content

Play sound