जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहितेचा लग्नात हुंडा दिला नाही म्हणून मानसिक व शारिरीक छळ केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रामेश्वर कॉलनी येथील माहेर असलेल्या पुनम कल्पेश घरटे यांचा विवाह नाशिक येथील कल्पेश सुभाष घरटे यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला. लग्नाच्या दोन महिन्यानंतर विवाहितेला लग्ना हुंडा व मानपान दिला नाही पती कल्पेश घरटे याने शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर सासरे, सासु, जेठ आणि जेठाणी यांनी लग्नात वस्तू आणल्या नाही म्हणून शिवीगाळ करणे आणि विवाहितेच्या आईला शिवागाळ केली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. याबाबत विवाहिता पूनम घरटे यांनी यांनी एमआयडीसी पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार २८ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता पती कल्पेश सुभाष घरटे, सासरे सुभाष हरी घरटे, सासु रत्ना सुभाष घरटे, जेठ निलेश सुभाष घरटे, जेठाणी हर्षदा निलेश घरटे सर्व रा. नाशिक यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय धनगर करीत आहे.