जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शाहून नगर येथील माहेर असलेल्या विवाहितेला माहेरहून तीन लाख रूपये आणण्याची मागणी करत मारहाण करत अंगावरील श्रीधन काढून छळ केल्याप्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनीवारी २२ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील शाहू नगर येथील माहेर आलेल्या विवाहिता स्वाती मनोज पाटील (वय-२४) यांचा विवाहित मार्च २०१९ मध्ये यावल तालुक्यातील डांभूर्णी येथील मनोज प्रेमचंद पाटील याच्याशी झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे काही दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला लहानसहान गोष्टींवर टोमणे मारणे सुरू केले. हा प्रकार झाल्यानंतर व्यापार करण्यासाठी माहेरहून तीन लाख रूपयांची मागणी केली. दरम्यान विवाहिते पैशांची पुर्तता न केल्याने तिला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर तिच्या अंगावरील सर्व दागिने काढून दिले. शिवास सासू, सासरे, जेठ जेठाणी आणि ननंद यांनी शारिरीक मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहितेने माहेरी निधून आल्या. दरम्यान, शनिवारी २२ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती मनोज प्रेमचंद पाटील, सासू भारती प्रेमचंद पाटील, सासरे प्रेमचंद तुळशीराम पाटील, जेठ विवेक प्रेमचंद पाटील, जेठाणी तनुजा विवेका पाटील आणि नणंद पल्लवी योगेश पाटील सर्व रा. डांभूर्णी ता.यावल यांच्याविरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक धनराज निकुंभ करीत आहे.