जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कापडाचा व्यापर करण्यासाठी माहेराहून ५ लाखांची मागणी करत नशिराबाद येथील माहेरवाशीनीला सासरी धरणगाव येथे मारहाण करत शारिरीक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नशिराबाद येथील माहेर असलेल्या रोशनजहॉ मोहम्मद सद्दाम वय २३ यांचा विवाह धरणगाव येथील मोहम्मद सद्दाम मोहम्मद सिद्दकी याच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला कापडाचा व्यापार करण्यासाठी माहेराहून ५ लाख रूपये आणावे अशी मागणी करण्यात आली. विवाहितेने पैसे आणले नाही या रागातून तिला सतत मारहाण करण्यात आली. तसेच सासू, सासरे, नणंद आणि दीर यांनी देखील शारिरीक व मानसिक छळ केला. या त्रास सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी मंगळवारी १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात पती मोहम्मद सद्दाम मोहम्मद सिद्दकी, सासरे मोहम्मद सिद्दकी मोहम्मद नूर, सासू मेहताबबी मोहम्मद सिद्दकी, नणंद सना कौसर शेख मुक्तार, नणंद फरीनबानो शेख इमरान, नणंद अफरीन बानो शेख जावेद आणि दीर शेख शोएब मोहम्मद सिद्दकी सर्व रा. धरणगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ अतुल महाजन हे करीत आहे.