पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कार घेण्यासाठी पाच लाख रुपयांच्या मागणीवरून एका विवाहितेचा तिच्या पतीसह सासरच्या मंडळींकडून मारहाण व छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुकन्या विशाल तायडे (वय २७) या वरणगाव येथील माहेर असलेल्या महिलेचा विवाह विशाल सुरेश तायडे (रा. भुसावळ) यांच्यासोबत पारंपरिक रीतीरिवाजांनुसार झाला होता. सुरुवातीचे काही महिने चांगले गेले, मात्र नंतर तिला लहानसहान गोष्टींवरून टोमणे मारले जाऊ लागले. सासरच्या मंडळींनी तिला माहेरहून कार घेण्यासाठी पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली.

माहेरहून पैसे आणण्यास नकार दिल्याने पती विशाल तायडे यांनी तिला शिवीगाळ व मारहाण केली. त्यानंतर सासू, सासरे, दिर, ननंद, नंदोई व अन्य सासरच्या नातेवाईकांनीही तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला. या छळाला कंटाळून सुकन्या माहेरी निघून गेली.

१९ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुकन्या यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पती विशाल सुरेश तायडे, सासू मिराबाई सुरेश तायडे, सासरे सुरेश बाजीराव तायडे, दिर सागर सुरेश तायडे, आकाश अरुण तायडे (रा. नागपूर), कविता सुरेश तायडे (रा. भुसावळ), ननंद रेखा सुरेश तायडे, मनिषा भगत सोनवणे, नंदोई भागवत वामन सोनवणे (दोघे रा. वरणगाव), तसेच विलास बाजीराव तायडे, अरुण बाजीराव तायडे, व मिनाबाई अरुण तायडे (तिघे रा. नागपूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार नागेंद्र तायडे करत आहेत.

Protected Content