जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीन प्लॉट घेण्यासाठी माहेराहून पाच लाखांची मागणी करत विवाहितेला मारहाण केल्याची तक्रार सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात देण्यात आली. याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील शिरसोली रोडवरील नेहरू नगरात माहेर असलेल्या सुजाता राहूल सपकाळ (वय-२५) यांचा विवाह पुणे जिल्ह्यातील मांजरी खुर्द येथील राहूल विजय सपकाळ यांच्याशी रितीरिवाजानुसार झालेला आहे. लग्नाचे सुरूवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर पतीला प्लॉट घेण्यासाठी महेराहून ५ लाखांची मागणी केली. दरम्यान, विवाहितेने माहेराहून पैसे आणले नाही म्हणून तिचा शारिरीक व मानसिक छळ केला. त्यानंतर तिला मारहाण देखील करण्यात आली. शिवाय सासू व मावस सासू यांनी देखील पैशांसाठी छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. दरम्यान, विवाहितेने सोमवारी ६ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पती राहूल विजय सपकाळ, सासू आशाबाई विजय सपकाळ आणि मावस सासू मनिषा लक्ष्मण सुर्यवंशी रा. मांजरी खुर्द ता.जि.पुणे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील हे करीत आहे.