जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील राम नगरातील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी ममुराबाद येथे १० लाख रूपयांची मागणीसह एसी व बुलेटीची मागणी करत छळ केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवार ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील राम नगरातील माहेर असलेल्या उजमा बी रिजवान शेख वय-२४ यांचा विवाह जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथील रिजवान मोहम्मद रफिक यांच्यासोबत झाला आहे. लग्नानंतर सासरच्या मंडळींनी विवाहितेला घर बांधण्यासाठी तिच्या माहेरुन १० लाख रुपये आणावे. तसेच तुझ्या वडीलांनी लग्नात ए.सी. व बुलेट दिली नाही, ते देखील घेवून ये, अन्यथा घरात रहाचे नाही, असे म्हणत विवाहिलेला शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच विवाहितेचा पतीशेख मोहम्मद रिजवान यांनी विवाहितेला २२ जून रोजी तीन पानांचे लेखी पत्र पाठवून त्यामध्ये मुस्लिम धर्मशास्त्र व जाती रिवारजानुसार मी तुला पहिला तलाक देत आहे. त्यामध्ये मैंने मेरी बिवी उजमा को पहिला तलाक दिया असा मजकूर लिहून ते पत्र पाठवले आहे. हा त्रास असह्य झाल्याने विवाहितेने गुरूवारी ८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जळगाव तालुका पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार विवाहितेचा पती रिजवान मोहम्मद रफिक, सासरे शेख रफिक शेख अजिज, नंदोई अफजल शेख मुनाफ, नणंद नाजमीन अफजल शेख रा. सारा हॉस्पिटलजवळ रामनगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास शिंदे हे करीत आहे.