भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहितेला १० लाखांची मागणी करत मिरज येथे सासरी मारहाण करत छळ केल्याचा प्रकार समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, भुसावळ शहरातील सिंधी कॉलनीतील बाहेर असलेल्या हर्षिता दीपक मेघानी वय-३० यांचा विवाह सांगली जिल्ह्यातील मिरज येथील दीपक अशोक मेघानी यांच्याशी रीतीरीवादानुसार झालेला आहे. दरम्यान लग्नाच्या सहा महिन्यानंतर विवाहितेला किरकोळ कारणावरून छळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर दीपक मेघानी याने व्यवसाय करण्यासाठी माहेराहून १० लाख रूपये आणावे अशी मागणी केली. दरम्यान विवाहितेने पैशांची मागणी पूर्ण केली नाही, याचा राग आल्याने दीपक अशोक मेघाने याच्यासह सासू, सासरे आणि नणंद यांनी शारीरिक व मानसिक छळ केला. तसेच शिवीगाळ करत मारहाण केली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता या माहेरी निघून आल्या. शुक्रवारी १९ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलिसात घेऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार पती दीपक अशोक मेघानी, सासू आशा अशोक मेघानी, सासरे अशोक कुमार मेघानी आणि नणंद दीपा अशोक मेघानी सर्व रा. मिरज जि. सांगली यांच्या विरोधात भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कांतीलाल केदारे हे करीत आहे.