Home Cities एरंडोल जुन्या वादातून महिलेला मारहाण करून विनयभंग

जुन्या वादातून महिलेला मारहाण करून विनयभंग


एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावातील महिलेला मारहाण करून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील एका गावात राहणारी ४२ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. दरम्यान त्यांच्या गावातील अशोक सोनवणे यांच्याशी त्यांचा वाद होता. याबाबत महिलेने यापूर्वी पोलिसात तक्रार दिली होती. याचा राग मनात ठेवून अशोक सोनवणे याने ३ मे रोजी सकाळी १० वाजता विवाहितेचा हात पकडला. अश्लिल शिवीगाळ करून महिलेला मारहाण केली.  तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. दरम्यान याप्रकरणी महिलेचा फिर्यादीवरून संशयित आरोपी अशोक सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण निकम करीत आहे.

 


Protected Content

Play sound