दीड लाखांसाठी विवाहितेला मारहाण करत छळ

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी पंचमहल येथे रिक्षा घेण्यासाठी माहेरहून दीड लाखांची मागणी करत मारहाण करून छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवारी ९ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगावातील सुप्रीम कॉलनी येथील माहेर असलेल्या रीना जयेश वंजारा वय ३० यांचा विवाह गुजरात राज्यातील पंचमहल येथील जयेश श्रावण वंजारा यांच्याशी झालेला आहे. दरम्यान पती जयेश याने विवाहितेला रिक्षा घेण्यासाठी माहेरहून दीड लाख रूपये आणावे अशी मागणी केली. विवाहितेने माहेरहून पैसे आणले नाही या रागातून तिला शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. तसेच सासू, सासरे, दिर, नणंद आणि नंदोई यांनी देखील पैशांसाठी छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आल्या. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पती जयेश श्रावण वंजार, सासू छबलाबाई श्रावण वंजारा, सासरे श्रावणे मथूर वंजारा, दीर कल्पेश श्रावणे वंजारा, नणंद सरोबाई उर्फ चोंगलीबाई बाबूलाल राठाडे आणि नंदोई बाबुलाल हजारी राठोड वय ५६ सर्व रा. पंचमहल गुजरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हेमंत जावध हे करीत आहे.

Protected Content