Home राजकीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज वाढदिवस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज वाढदिवस

0
23


amit shaha 1

मुंबई वृत्तसंस्था । भाजपा अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा आज वाढदिवस आहे. शाह यांचा 55 वा वाढदिवसनिमित्ताने देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

कर्मठ, अनुभवी, कुशल संगठनकर्ता आणि मंत्रिमंडळातील माझे सहयोगी अमित शाह यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सरकारमध्ये बहुमूल्य योगदानासोबतच भारताला सशक्त आणि सुरक्षित बनवण्यासाठी ते महत्त्वाचं योगदान देतायेत. ईश्वर त्यांना दीर्घायू आणि प्रकृती नेहमी उत्तम ठेवो, असे ट्विट मोदींनी केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही शाह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तुमच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतो. तुमच्याकडून अशाच प्रकारे देशाची सेवा होत राहो, असं गडकरींनी म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीही शाह यांना शुभेच्छा देताना दिर्घायुष्याची प्रार्थना केली आहे. याशिवाय अन्य अनेक नेत्यांनी शाह यांना जन्मदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound