जळगाव (प्रतिनिधी) आज सकाळपासून शहरातील सात वैद्यकीय व्यावसायिकांवर एकाच वेळेस धाडी टाकण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान, ईडीच्या नोटीसांना संबंधितांकडून समाधाकरण उत्तर न मिळाल्यास अशा प्रकारचे धाडसत्र राबविण्यात येत असते,असे जाणकारांचे म्हणणे आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की, औरंगाबाद येथील आयकर खात्याच्या पथकांनी शहरातील सात हॉस्पीटल्सवर एकाच वेळी धाडी टाकल्या. या संदर्भात सूत्रांनी माहिती दिली की, जळगाव शहरातील सात ख्यातप्राप्त वैद्यकीय व्यावसायिकांवर धाडी टाकण्यासाठी नाशिक आणि धुळे येथील पथकांना पाचारण करण्यात आले होते. आज सकाळी नऊच्या सुमारास ही पथके पहिल्यांदा आयकर खात्याच्या कार्यालयात आले. यानंतर आयएमआर महाविद्यालयाच्या मैदानावर ही पथके आली. येथेच त्यांना नेमक्या कोणत्या हॉस्पीटल्सवर धाडी टाकावयाच्या आहेत ? याची माहिती देण्यात आली. यानंतर सकाळी दहाच्या सुमारास शहरातील सात वैद्यकीय व्यावसायिकांवर एकाच वेळी धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यात गोल्डसिटी, वर्धमान अॅक्सीडेनट,चिन्मय हॉस्पिटल,डाबी न्युरो सेंटर, शहा डायग्नोस्टीक सेंटरचा समावेश असल्याचे कळते. या सर्वठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.त्यामुळे कुणालाही आत सोडले जात नव्हते. सुमारे अकरा तास उलटूनही रात्री उशिरापर्यंत सर्व पथके संबंधीतांच्या कार्यालयात कागदपत्र तपासात होते. दरम्यान, ईडीच्या नोटीसांना संबंधितांकडून समाधाकरण उत्तर न मिळाल्यास अशा प्रकारचे धाडसत्र राबविण्यात येत असते,असे जाणकारांचे म्हणणे आहे.
पहा– आयकर खात्याच्या तपासणीबाबतचा हा वृत्तांत.