चोरगाव येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्त्या

hangging

जळगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील चोरगाव येथील तरूणाने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी 4 वाजता उघडकीस आली असून याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यू करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, समाधान शालीक पवार (वय- 41) रा. चोरगाव ता. धरणगाव याने घारात कोणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना सायंकाळी 4 वाजता घडली. मयत समाधान हा घरातील एकुलता एक मुलगा होता. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. पत्नी आणि वडील शालीक पवार हे सासुरवाडी येथे नातेवाईकांकडे चमगाव येथे गेले होते. चुलत भाऊ यांच्या लक्षात आल्यानंतर त्याला खाली उतरवून तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. मयतच्या पश्चात वडील, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परीवार आहे. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Protected Content