Home क्राईम बलात्काऱ्याला फाशी द्या; चिठ्ठी लिहून तरुणीची आत्महत्या

बलात्काऱ्याला फाशी द्या; चिठ्ठी लिहून तरुणीची आत्महत्या


मौदा (वृत्तसंस्था) आई माझ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी, ही माझी शेवटची इच्छा आहे. त्याला एवढी कडक शिक्षा द्या की, त्याने कधीच पुन्हा असे करू नये,या आशयाची चिठ्ठी लिहून बलात्कार पिडीत तरुणीने आत्महत्या केल्याने खळबळ उडालेली आहे. मौदा तालुक्‍यातील मारोडी येथील तरुणीनीला दारू पाजून शुक्रवारी अत्याचार करण्यात आला होता. दरम्यान, गळफास घेण्याच्या आधी लिहिलेल्या मृत्यूपूर्व चिठ्ठीत तिने ‘आरोपी मयूर कुलरकरला फाशी द्या’ असे लिहून ठेवले आहे.

शुक्रवारी रात्री मारोडी बसस्थानकावर मुख्य आरोपी मयूर कुलरकरने पीडितेवर अत्याचार केला होता. यानंतर मयूरसोबत असलेल्या दोन आरोपींनी तिला रस्त्यावर टाकून दिले होते. या घटनेची तक्रार तिने मौदा पोलिसांत केली. यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, या घटनेनंतर रविवारी दुपारी पीडितेने घरीच आत्महत्या केली. आई दहा मिनिटांसाठी घराबाहेर गेली असताना तिने गळफास घेतला. पीडितेचा १० मार्चला विवाह होणार होता. तिला वडील नसून घरी आई आणि लहान भाऊ आहेत. दोघेही शेतीत मजुरी करतात. पीडितेने मृत्यूपूर्व लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. यात ‘मयूर कुलरकरला फाशीची शिक्षा देण्यात यावी’ अशी शेवटची इच्छा तिने व्यक्त केली आहे. चिठ्ठीत पुढे म्हटले आहे की, आई मी खूप मोठा गुन्हा केला आहे. मी तुझी गोष्ट कधीच ऐकली नाही. पण, आज पश्‍चाताप करून काहीच उपयोग नाही. कारण आता खूप उशीर झाला आहे. लोकांच्या नजरेत मी वाईट होतेच आणि राहणारच. मी माझ्यावर झालेला प्रसंग पोलिसांपर्यंत न्यायला नको होता. आई माझ्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी, ही माझी शेवटची इच्छा आहे. त्याला एवढी कडक शिक्षा द्या की, त्याने कधीच पुन्हा असे करू नये. बाकी तिघांना सोडून द्यावे हीच माझी शेवटची इच्छा आहे. तुम्हा सगळ्यांकडून तुम्ही मला माफ कराल अशी आशा करते. यापुढे तुम्ही सर्व माझ्यापासून मुक्त आहात. दरम्यान, या घटनेमध्ये आरोपी मयूर कुलरकर सोबत असलेले श्‍याम कातोरे, राहुल कांबळी आणि विधिसंघर्ष बालकाला सोडून देण्यात यावे, असेही तिने लिहले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound