चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या; शिवसेना महिला आघाडीचे निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तीची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा करावी, या मागणीचे निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सोमवार ३ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या ७ वर्षाच्या एका बालिकेवर अमानुष व मानवतेला काळिमा फासणारे कृत्य करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेचा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत संशयित आरोपी संतोष थोरात याला फाशीची शिक्षा द्यावी, यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा तसेच पीडित कुटुंबियांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे.

 

या निवेदनावर शिवसेना महिला आघाडीच्या महानगराध्यक्ष शोभा चौधरी, सरिता माळी कोल्हे, शहर प्रमुख मनिषा पाटील, उपशहरप्रमुख विमल वाणी, निलु इंगळे, संजय सांगोळे, किशोर बोरसे, कल्पना बुंदळे यांच्यासह आदी महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content