औरंगाबाद (वृत्तसंस्था) ग्राहकांनी महावितरणच्या अधिकृत वीज बिलाचा भरणा केंद्रावरच बिलाचा भरणा करावा. वीज बिलाचा भरणा करतांना संगणकीय पावत्याच स्वीकाराव्यात. बिलाच्या हस्तलिखित पावत्या स्वीकारू नयेत. तेंव्हा वीज ग्राहकांनी सतर्क राहावे. हस्तलिखित वीज बिलाच्या पावत्या देण्यात येत असल्याचे आढळून आल्यास तात्काळ महावितरण प्रादेशिक कार्यालयाच्या भ्रमणध्वनी क्रमांक 7391046025 वर किंवा जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन महावितरण प्रादेशिक कार्यालय औरंगाबाद यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
वीज बिलाचा नियमित भरणा करणे सुलभ व्हावे, यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in संकेतस्थळासह मोबाईल ॲप ची ऑनलाईन वीज बिल भरणा सुविधा उपलब्ध आहे. त्या सोबतच सहकारी नागरी पतसंस्था, खाजगी पतपेढ्या, टपाल कार्यालय, महा-ईसेवा केंद्र, आपले सरकार केंद्र आदी पर्याय आहेत.