इस्त्राइलच्या हल्ल्यात हमासचा सैन्यप्रमुख मोहम्मद दाईफ ठार

तेल अवीव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | इस्रायली लष्कराने गुरुवारी दावा केला की, हमासचा सैन्य प्रमुख मोहम्मद दाईफ आपल्या हल्ल्यात ठार झाले आहेत. गाझा येथील खान युनिस येथे १३ जुलै रोजी लढाऊ विमानाने केलेल्या हल्ल्यात तो ठार झाल्याचे लष्कराने सांगितले. मोहम्मद दाईफच्या मृत्यूची बातमी बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती पण आज त्याला दुजोरा मिळाला आहे.

हमासचे तीन मोठे नेते होते ज्यांनी इस्रायलवरील हल्ल्यात मोठी भूमिका बजावली होती. यामध्ये हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानिये, गाझा प्रमुख याह्या सिनवार आणि लष्करी प्रमुख मोहम्मद दाईफ यांचा समावेश होता. मोहम्मद दाईफ आणि इस्माईल हानिये यांच्या मृत्यूनंतर, आता फक्त याह्या सिनवार हा हमासमध्ये सर्वात मोठा नेता राहिला आहेत. इस्रायलने 7 वेळा दाईफला मारण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो यशस्वी झाला नव्हता. वारंवार जिवंत राहिल्यामुळे त्याला ‘9 जीव मिळालेली मांजर’ असे संबोधण्यात आले. इस्त्रायली सैन्याने दाईफला मारण्याचा आठवा प्रयत्न यशस्वी केला.

Protected Content