चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । हळदीच्या कार्यक्रमात नाचण्याच्या कारणावरून विवाहितेला लाकडी दांड्यासह लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, येथील राहुल पंडित चव्हाण यांच्या हळदीनिमित्त गुरूवार, १२ रोजी राहत्या घरी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास सगळी मंडळी डीजेवर नाचत होती. तेवढ्यात काही मंडळी त्याठिकाणी जमली. व नाचण्यावरून एका विवाहितेसह तिच्या नणंदला शिवीगाळ केली. त्यानंतर लाकडी दांड, लोखंडी गज व मोटारसायकच्या चैनने मारायला सुरवात केली. प्रवीण प्रकाश चव्हाण यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता. त्यालाही जबर मारहाण केली. या मारहाणीत सदर महिलांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सोनाली प्रवीण चव्हाण यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात १६ सोळा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल
विनोद मोरसिंग पवार, मनोज मोरसिंग पवार, सुनीता मोरसिंग पवार, हारसिंग पंडित पवार, प्रदीप ममराज पवार, बादल पंडित पवार, रोहिदास हेमा पवार, जितेश संजय पवार, वनिता संजय पवार, प्रवीण पवार, संदीप रामसिंग राठोड, लहू रामसिंग राठोड, निलेश रोहिदास पवार, उमेश रोहिदास पवार, आकाश तुळशीराम राठोड व प्रकाश तुळशीराम राठोड सर्व रा. शिवापूर ता. चाळीसगाव असे संशयित आरोपीतांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोउनि लोकेश पवार हे करीत आहे.