जळगाव प्रतिनिधी । गेल्या आठवड्यात तांबापूरा भागात दगडफेक आणि दंगली झाली होती. त्यातील हद्दपार आरोपी भोलासिंग याला पकडण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले असून त्याच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगावातील तांबापूर भागात लग्नानिमित्त आयोजित गोंधळाच्या कार्यक्रमात दुचाकी घातल्याच्या कारणावरुन दोन गटाकडून तुफान दगडफेक झाली. एका गटाकडून तलवारीचा वापर झाला. यात दोन्ही गटाकडील सात ते आठ जण जखमी झाले होते. यातील या घटनेतील दोन्ही गटातील 14 जणांना अटक करण्यात आली होती. यातील फरार आरोपी भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय-25) रा. शिरसोली नाका, तांबापूर हा शिकलकर वस्तीत आला असल्याची माहिती सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांना मिळाल्यानंतर त्यांनी जितेंद्र राजपूत, विजय नेरकर, सचिन पाटील यांना सोबत घेत सिकलकर वाड्यात जावून भोलासिंग याला ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संशयित आरोपी भोलासिंग याला एक वर्षाकरीत शहरातू हद्दपार करण्याचे आदेश असतांना आदेशाचा भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा देखील नोंदविण्यात आला आहे.