मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्या आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कसून तयारीला लागले आहे. अशातच महायुतीतील घटकपक्ष युतीतून बाहेर पडला आहे. महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.
महादेव जानकर यांना धनगर समाजाचे नेते आहे. त्यांनी २०२४ साली परभणी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. परंतू त्यांचा पराभव झाला होता. ते २०१४ पासून युतीसोबत होते. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये राज्यमंत्रीपदही देण्यात आले होते. परंतू गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. महायुतीच्या जागावाटपात आपल्याला विचारले जात नाही, म्हणून त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.