जामनेर प्रतिनिधी । येथील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज (दि.२६) रोजी ७०वा भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आर.जे. सोनवणे यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची शपथ देण्यात आली. तसेच २६/११च्या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या वीर जवानांना व निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.