
पिंप्री खु. ताः धरणगाव (प्रतिनिधी) गावातील एरंडोल फाटया जवळ गटारींचे पाणी पूर्णतः रस्त्यावर येत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.
या संदर्भात अधिक असे की, गावातील एरंडोल फाटया जवळ गटारींचे पाणी पूर्णतः रस्त्यावर येत आहे. परंतु याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने पुर्णपण डोळेझाक केली आहे. एवढेच नव्हे तर, गावतील अनेक गटारी देखील तुडुंब भरल्या असून प्रशासन कोणत्याही प्रकारचे लक्ष देण्यास तयार नाहीय. विशेष म्हणजे या रस्त्यालगत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तसेच विद्यमान उपसरपंच यांची दुकाने असूनही गटारीचे पाणी रस्त्यावर येण्या सारख्या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष केले जातेय. सांडपाणी थेट रस्त्यावर येत असल्यामुळे रहदारीसही मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनावर नियंत्रण कोणाचे? असा सवाल सर्वसामान्य जनतेनून विचारला जात आहे. तसेच संबंधीत अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे लक्ष दयावे . अशी मागणीही ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.