Home क्राईम गुटखा तस्करी विरोधात धडक कामगिरी : एक कोटींचा ऐवज जप्त !

गुटखा तस्करी विरोधात धडक कामगिरी : एक कोटींचा ऐवज जप्त !

0
240

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर तालुक्यात एलसीबी, मुक्ताईनगर पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाईत ७७ लाख रूपयांच्या गुटख्यासह एकूण एक कोटी दोन लाख रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.

मध्यप्रदेशातून मुक्ताईनगरच्या मार्गाने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी होत असते. या अनुषंगाने आधी देखील काही मोठ्या कारवाया झाल्या आहेत. आज पोलिसांनी पुन्हा एकदा जोरदार कारवाई करत गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याच्या अंतर्गत, आशिष राजकुमार जयस्वाल (रा. ग्राम भमोरी, वार्ड नं. १४ देवास, मध्यप्रदेश) आणि आशिफ खान बुल्ला खान (रा. शिवशक्ती नगर, दत्तवाडी, नागपुर) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात, गुटखा वाहतुक करणा-या वाहनासह एकुण 1 कोटी 2 लाख 33 हजार 460 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाई ही, एलसीबी, पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने केली. यात एलसीबीचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ सलीम तडवी, पोकॉ छगन तायडे, रतन गिते, मयुर निकम, भरत पाटील तसेच मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आशिष अडसुळ, सहायक पोलिस निरीक्षक जयेश पाटील, पोकॉ रवी धनगर, संदीप धनगर, चेतन महाजन व अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी किशोर बाविस्कर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.


Protected Content

Play sound