सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यात प्रतिबंधित असलेला गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांवर सावदा १३ जानेवारी रोजी तीन संशयित आरोपींना अटक केली. या कारवाईत लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून, तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या वाहनांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.
घटना चिनावल गावातील उटखेडा रस्त्यावर, सुकी नदीवरील पुलाजवळून अवैधपणे गुटखा आणि तंबाखूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती सावदा पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी १३ जानेवारी रोजी कारवाई केली. यात संशयित आरोपी अवैधरित्या महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू वाहतूक करत असल्याचे आढळले. या कारवाई विविध ब्रँडचे गुटखा आणि सुगंधित तंबाखू, ज्यांची एकूण किंमत १ लाख २८ हजार ५५७ रुपये असून ९५ हजार रूपये किंमतीची तीन वाहने जप्त करण्यासत आले आहे. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनच्या पोलीस हवालदार निलेश जगतराव बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून अजय शांताराम कोळी (रा. रोझोदा), यश उर्फ योगेश पितांबर चौधरी (रा. चिनावल), आणि अस्लम सलीम तडवी (रा. लोहरा, ता. रावेर) या तिघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.