जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गुटखा तस्करी करणारे सिंधी कॉलनीतील रहिवासी पिता आणि पुत्राला जिल्ह्यातून एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सिंधी कॉलनीतील रहिवासी रमेश तेजानंद जेठवाणी ( वय ५८) आणि दीपक रमेश तेजवाणी ( वय २४) या दोघांच्या हद्दपारीचे आदेश जारी केले आहेत. या दोघांवर प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याच्या तस्करीबाबत जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.
या अनुषंगाने या दोघांना हद्दपार करण्यात यावे असा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या संदर्भातील विविध बाबींची पूर्तता झाल्यानंतर रमेश तेजानंद जेठवाणी आणि दीपक रमेश तेजवाणी या दोघांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.