जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | गुरुवर्य प. वि.पाटील विद्यालयात विविध उपक्रमांनी साजरा होत आहे शैक्षणिक सप्ताह. राष्ट्रीय शिक्षण धोरण च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै या कालावधीत शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक शाळेमध्ये शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे.
या शैक्षणिक सप्ताहामध्ये अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, मिशन लाईफच्या दृष्टिक्षेपात इको क्लब दिवस , शालेय पोषण दिवस, समुदाय सहभाग दिवस इत्यादी दिवसांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर जळगाव येथे मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक सप्ताहातील विविध दिवस साजरे होत आहे. त्यात विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना या सप्ताह मधून वाव मिळत असून विद्यार्थी मनोरंजनात्मक पद्धतीने अध्ययन करत आहे. सदर सप्ताह यशस्वीरित्या होण्यासाठी सर्व शिक्षक कसे शिक्षक केले तर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.