जळगाव प्रतिनिधी | येथील सामाजिक कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी गाळेधारकांना कडून थकित भाडे वसुलीबाबत तसेच यासंदर्भातील इतर विषयांवर शासनाकडे वेळोवेळी तक्रार दाखल केली होती. दरम्यान, शासनाने महापालिका आयुक्त यांना आज २७ ऑगस्ट रोजी गाळ्यासंदर्भात कोणतीकारवाई केली याचा अहवाल शासनास सादर करावा असे पत्र पाठविले असल्याची माहिती दीपक कुमार गुप्ता यांनी दिली आहे.
दीपक कुमार गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी शासनास २९ एप्रिल २०१९ रोजी गाळेधारकांकडून थकीत भाडे वसुलीबाबत. १७ मे २०१९ रोजी मुदत संपलेल्या गाळेधारकांकडून थकीत भाडे वसुलीबाबत. २२ मे २०१९ रोजी महानगर पालिकेस आर्थिक नुकसानीतून वाचविण्यासाठी आयुक्त यांची चौकशी करण्याबाबत. १४ जून २०१९ रोजी आयुक्त यांच्यावर कारवाई करण्याबाबत. १७ मे २०१९ रोजी मुदत संपलेल्या गाळेधारकांकडून थकीत भाडे वसुलीबाबत. तर १० व १९ ऑगस्ट २०१९ रोजी महानगर पालिकेच्या थकबाकीदार गाळेधारकांच्या विरुद्ध जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या अपिल अर्जात महानगर पालिकेची बाजू योग्यरित्या न मांडल्यामुळे महानगर पालिकेस आर्थिक नुकसान झाल्याबाबत पत्र दिले होते. याकडे दुर्लक्ष केल्याने गुप्ता यांनी आज मुख्य सचिव अजय मेहता, नगरविकास विभाग प्रधान सचिव मनीषा म्हसकर , अवर सचिव शंकर जाधव, कक्ष अधिकारी सुनीलकुमार धौंडे यांना मेल करून त्यांनी गाळ्यांसंदर्भात केलेल्या वारंवार केलेल्या तक्रारींवर कोणती कारवाई केली याचा खुलासा मागितला. यासंदर्भात आज त्यांनी चार मेल केले असल्याचे गुप्ता यांनी कळविले आहे. दरम्यान, सात वेळेस मेल व पत्र लिहूनही गाळेधारकांवर कोणतीच कारवाई न केल्याने मनीषा म्हसकर , सुनीलकुमार धोंडे यांना मेल करून शासनाच्या संबधित अधिकाऱ्यांच्या निषेध केला आहे. तसेच निषेधार्थ प्रत्यक ६० मिनिटांनी कारवाई करण्यासंदर्भात सूचित करण्यासाठी रिमाइंडर पाठविण्यात येईल असे स्पष्ट केले होते.