वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गुणगौरव

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील वंजारी समाजातील २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात १० वी व १२ वी परीक्षेत ६५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच पदवी व पदवीत्तरधारक विद्यार्थ्यांचा जळगाव जिल्हा युवा वंजारी संघटनेतर्फे गुणगौरव करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लाडवंजारी समाज मंगल कार्यालय येथे रविवार ७ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. तरी समाजातील विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत ३० जून पर्यत संघटनेच्या प्रशांत नाईक ९९२३८ ९९३३८, नामदेव वंजारी ९३७०० ०८९३१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Add Comment

Protected Content