गुलाबराव पाटील यांनी मराठा समाजात भानगडी लावल्या : जानकीराम पाटील

jankiram patil zp

 

जळगाव (प्रतिनिधी) राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघात प्रत्येक गावातील मराठा समाजात भानगडी लावल्या. एवढेच नव्हे तर,स्वतःच्या गुजर समाजातही अशाच पद्धतीने वाद लावले. तसेच एलईडी लाईट योजनेत मोठा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप करत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, जिल्हा परिषद उपाध्यक्ष जानकीराम पाटील यांनी आज शहरातील हॉटेल रॉयलमध्ये घेतली. यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर भ्रष्टाचारासह अनेक गंभीर आरोप लावलेत. यावेळी पाटील यांनी म्हटले की, ज्या माणसाने खानदेशात शिवसेना संपवली. आज त्याच माणसाला पुन्हा एकदा उमेदवारी मिळत आहे. अगदी तुम्ही सुरेशदादा जैन यांना देखील विचारले तरी ते देखील हेच सांगतील. चिमणराव पाटील यांच्यासह अनेकांच्या विरोधात षड्यंत्र रचले. रावसाहेब पाटील,जळकेकर महाराज यांच्यासह अनेकांना राजकीय जीवनात त्रास दिला.

 

गुलाबराव पाटील यांनी पाचोऱ्यात किशोरअप्पा पाटील व प्रकाश सोमवंशी, एरंडोलमध्ये चिमणराव पाटील व मच्छिंद्र पाटील यांच्यात भांडण लावलेत. तसेच चोपड्यातही माजी आमदार कैलास पाटील व विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यातील मतभेद देखील वाढवले. गुलाबराव पाटील यांचे चिरंजीवच त्यांना घरी बसवतील. आम्ही पक्षश्रेष्ठींकडे या सगळ्या गोष्टी मांडल्या आहेत. आमच्यातील अनेक जण शिवसेनेकडून इच्छुक होते. परंतू गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये बैठक होऊ दिली नाही. जर जळगावमध्ये मेळावा घेतला असता तर त्यांच्यावर बुटांचा मारा पडला असता,असे म्हटले. दरम्यान, जानकीराम पाटील हे कधीकाळी ना.पाटील यांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक होते.

 

Protected Content