गुलाबराव देवकरांकडून ओल्या दुष्काळाची पाहणी

galabrao devkar news

धरणगाव प्रतिनिधी । अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी जळगाव ग्रामीण मतदार संघात ओला दुष्काळाची पाहणी केली.

राज्यात परतीच्या पावसामुळे तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. धरणगाव तालुक्यातील दोनगाव, चोरगाव, धार, पथराड, झुरखेडा, सोनवद, बाभूळगाव, उखळवाडी, साळवा, रोटवद, पिंपळे, मुसळी, एकलग्न या गावातील शेतकऱ्यांच्या शेती शिवारात थेट जाऊन प्रत्यक्ष नुकसानाची पहाणी करत शेतकऱ्यांशी सवांद साधला. शासनाकडून देखिल पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. प्रती हेक्टरी पन्नास हजार रूपयाची नुकसान भरपाई , सरसकट कर्ज माफी व पिक विमा कंपनी कडून तत्परतेने नुकसान भरपाई मिळावी. या प्रमुख मागणीसाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे अश्वासन दिले.

यांची होती उपस्थिती
या दुष्काळ पहाणी दौऱ्यात राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिपक वाघमारे, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, तालुकाध्यक्ष धनराज माळी, विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील, माजी जि.प.सदस्य रविंद्र पाटील, मोहन पाटील, युवक तालुकाध्यक्ष नाटेश्वर पवार, डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ.नितीन पाटील, युवक तालुका कार्याध्यक्ष मनोज पाटील, बाजार समितीचे माजी उपसभापती रंगराव सावंत, अंजनविहिरेचे सरपंच डॉ. विलास चव्हाण, सतखेड्याचे सरपंच कृषीभूषण शरद पाटील, चावखेड्याचे सरपंच राजू वाणी, गंगापुरीचे सरपंच अनिल पाटील, दोनगावचे सरपंच सुभाष पाटील, सोनवदचे माजी सरपंच बाळू आबा, माजी तालुकाध्यक्ष संजय संतोष पाटील, रोटवदचे जिजाबराव पाटील, गजानन पाटील, मुसळीचे रघुनाथ पाटील, कवठळचे नवल पाटील, भोण्याचे माजी सरपंच संजय पाटील, गंगापुरीचे निंबा पाटील, अंजनविहिऱ्याचे प्रदीप पाटील, साकऱ्‍याचे घनश्याम पाटील, साळव्याचे सीमा नेहेते, किशोर बऱ्हाटे, किरण नेहेते, दीपक भोई, संजय पाटील, नवल आप्पा, साईनाथ पाटील, जगदिश पाटील, हेमंत पाटील, विवर्याचे किरण देशमुख, सुभाष पाटील, संभाजी कंखरे, मेघराज पाटील, लक्ष्मण पाटील, सागर वाजपेयी, समाधान पाटील, गोकुळ पाटील, सुभाष पाटील तसेच पक्षाच्या सर्वच सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Protected Content