धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे महायुतीचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठ्या फरकाच्या मताधिक्याने विजय मिळवून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा पराभूत केले आहे. मंत्री गुलाबराव पाटील हे ५९ हजार १३० च्या फरकाने ते विजयी झाले आहेत. त्यांना १ लाख ४२ हजार ५९१ मते मिळवून विजयी झाले आहे. सलग तिसऱ्यांदा तर आतापर्यंत पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
जळगाव ग्रामीण विधानसभेच्या निवडणुकीत प्रमुख दोन मातब्बर नेते मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह इतर पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यांनी प्रचार सभेच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्याचे पाहायला मिळाले. मंगळवारी १९ नोव्हेंबर रोजी जळगाव ग्रामीण मतदार संघात एकुण ६९.३३ टक्के मतदान झाले होते. शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेच्या झालेल्या मतमोजणीत मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या २६व्या फेरीपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. तर त्यांनी विरोधात असलेल्या सर्व उमेदवारांचा सुपडा साफ करत मोठ्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. यात गुलाबराव पाटील यांना १ लाख ४२ हजार ५९१ तर महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर ८३ हजार ४६१ मते मिळाली, मनसेचे मुकुंद आनंद रोटे यांना १ हजार ६१२, वंचितचे प्रवीण जगन सपकाळे यांना १ हजार ४२४ अशी मते मिळाली आहे. सकाळपासून सुरू असलेल्या या मतमोजणीत दुपारी ४ वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हात येऊन मंत्री गुलाबराव पाटील हे विजय झाल्याचे घोषित करण्यात आले.