यावल प्रतिनिधी । यावल तालुका आरोग्य विभागाकडुन मनवेल येथे गणेशोत्सवाचे औचित्य साधुन क्षयरोग आजार कसा बरा होतो. त्यावर काय उपचार केले पाहिजे, या विषयावर गावातील गणेश मंडळातर्फे विविध कार्यक्रमाव्दारे मार्गदर्शन करण्यात येत असून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
क्षयरोग मुक्त अभियान अंतर्गत प्रभारी यावल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. फिरोज तडवी, क्षयरोग विभागातील नरेद्र तायडे साकळी येथील डॉ. सागर पाटील, डॉ. स्वाती कवडीवाले यांच्या मार्गदर्शना खाली मनवेल येथे क्षयरोग आजार हद्दपार करणे, पोषण आहार व मातृत्व वंदना योजना याविषयी मार्गदर्शन आशा स्वंयमसेविका रंजना कोळी, पुनम पाटील, ज्योति मोरे यांनी केले.
सरपंच जयसिंग सोनवणे, तंटामुक्त गाव समीती अध्यक्ष बबन पाटील, अंगणवाडी सेविका कल्पना पाटील ,प्रमिलाबाई कोळी उपस्थित होते. क्षयरोग या आजारावर विविध प्रकारची पोस्टर व रागोळ्या द्वारे जनजागृती या कार्यक्रमात करण्यात आली महर्षि वाल्मीक बाल गणेश मंडळाच्या कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.