Home Cities अमळनेर घनकचरा व्यवस्थापन आणि उद्योगाच्या संधींवर अमळनेर मेळाव्यात मार्गदर्शन !

घनकचरा व्यवस्थापन आणि उद्योगाच्या संधींवर अमळनेर मेळाव्यात मार्गदर्शन !


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी इंदिरा गांधी भवन येथे एक संयुक्त आणि यशस्वी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वच्छ महाराष्ट्र अभियान- स्वच्छ सर्वेक्षण २०२५, अमळनेर नगर परिषद – स्वच्छता विभाग आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सफाई अपनावो बिमारी भगाओ अभियान’ अंतर्गत हा महिला बचत गट मेळावा पार पडला.

या मेळाव्याप्रसंगी कुशाग्र फाऊंडेशनतर्फे घनकचरा व्यवस्थापन, कचरा विलगीकरण, संकलन व प्रक्रिया यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, घनकचरा व्यवस्थापनांतर्गत उपलब्ध असलेल्या विविध व्यवसाय आणि उद्योगधंद्यांच्या संधींबद्दलही उपस्थित महिलांना माहिती देण्यात आली. मुकेश चव्हाण आणि श्री. देवेंद्र केळोदे यांनी उपस्थित बचत गट महिलांना याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

या कार्यक्रमास एकूण ५० महिला, स्वच्छता विभागातील आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने अमळनेर शहरातील महिला बचत गटातील सदस्य, स्वच्छता निरीक्षक संतोष बिऱ्हाडे व किरण कंडारे, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानचे समन्वयक चंद्रकांत मुसळे, स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक गणेश गढरी, तसेच तुकाराम भोई, उज्ज्वला पाटील, योगेश पवार, सतीश बिऱ्हाडे, श्याम करंदीकर, अनंत संदानशिव, जया सरदार, समाधान बच्छाव, युनूस शेख आदी कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अखेरीस, उपस्थित सर्व नागरिकांना स्वच्छता आणि हरित शपथ देण्यात आली. तसेच, कापडी पिशव्यांचे वाटप करून दैनंदिन जीवनात त्यांचा वापर करण्यावर आणि प्लास्टिकचा वापर टाळण्यावर भर देण्यात आला. या उपक्रमामुळे अमळनेर शहरातील स्वच्छता आणि पर्यावरणविषयक जागृती वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.


Protected Content

Play sound