विद्यापीठात ‘ध्येय निर्धारण आणि प्रेरणा’ या विषयावर मार्गदर्शन

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाद्वारे ‘ध्येय निर्धारण आणि प्रेरणा’ या विषयावर गुरूवार (दि.२३ डिसेंबर) रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात ध्येय निश्चित केले पाहिजे. ध्येय वास्तववादी आणि आव्हानात्मक असावे. ध्येय जितके अधिक आव्हानात्मक असेल तर ते साध्य करण्याची उत्कटता जास्त असते. आपण अंतर्गत सक्षम असले पाहिजे, असे प्रतिपादन रागीब अहमद अब्दूल नाबी, कॉर्पोरेट सॉफ्ट स्किल आणि मॅनेजमेंट ट्रेनर यांनी ‘ध्येय निर्धारण आणि प्रेरणा’ या विषयावर बोलतांना केले.

परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ.डी.एस.दलाल हे अध्यक्षस्थानी होते. रागीब पुढे म्हणाले की, चिंता आणि भिती या दोन गोष्टीवर मात करणे शिकलात तर जग जिंकले असे समजा. मार्गदर्शन करतांना त्यांनी अनेक दाखले दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन सोनाली दायमा, प्लेसमेंट ऑफिसर यांनी केले. कार्यशाळेत युनिर्व्हसिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस, स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस, स्कूल ऑफ एन्व्हॉयर्मेंन्टल अॅण्ड अर्थ सायन्सेस व स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस ह्या प्रशाळेतील १६० विद्यार्थी उपस्थित होते.

 

Protected Content