जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय हिंदू संघटनेचा १३ वा वर्धापन दिन बुधवारी १ ऑक्टोबर रोजी जळगाव शहरातील पांजरापोळ गोशाळा येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
या वर्धापन दिनानिमित्त अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून जळगाव शहर आमदार राजू मामा भोळे, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, सामाजिक कार्यकर्त्या मंगला बारी, शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, सनातन संस्थेचे प्रशांत जुवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार शर्मा, तसेच चंद्रशेखर देशमुख, मंगल परदेशी, दीपक तांबट, दीपक परदेशी, प्रा. सुरेश वाघ, कडू पाटील यांच्यासह अनेक नागरिकांनी कार्यक्रमाला हजेरी लावून शुभेच्छा दिल्या.

उपस्थितांनी संघटनेच्या गेल्या १३ वर्षांतील कार्याचा आढावा घेतला आणि हिंदू संस्कृती, धर्म आणि राष्ट्रप्रेम या मूल्यांच्या जतनासाठी संघटना करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमातून संघटनेच्या कार्यकर्त्यांना भविष्यातील कार्यासाठी प्रेरणा मिळाली. वर्धापन दिनाचे आयोजन गोशाळेत केल्यामुळे गोरक्षणाचा संदेशही यानिमित्ताने देण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथींनी संघटनेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सामाजिक सलोखा टिकवून राष्ट्रीय कार्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमामुळे शहरातील विविध सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतील व्यक्तींना एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची संधी मिळाली.



