रावेर प्रतिनिधी । किशोरवयीन मुली अधिक भावनिक असतात. कोणत्याही मोहात त्या सहज अडकतात. लहानसहान गोष्टींवरून चिंतातुर होतात किंवा संताप व्यक्त करतात. यासाठी तालुक्यातील सावदा येथील पालिका संचालित वि.ह.पाटील आणि ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने (दि ५) रोजी किशोरवयीन मुलींचे समुपदेशन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
किशोरवयीन मुलींचे समुपदेशन मंगला डांगे यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्याते ए.टी.झांबरे विद्यालय येथील पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थींना संपदेशन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. किशोरवयीन मुलींचे समुपदेशन या प्रमुख विषयाला अनुसरून प्रसिद्ध व्याख्याता तसेच आकाशवाणी वरील निवेदिका, प्रणिता झांबरे यांनी ना.वि.ह.पा. विद्यामंदिर सावदा व ना.गो.पा.कनिष्ठ महविद्यालय, सावदा येथील किशोरवयीन इयत्ता ८ ते १२ वीच्या विद्यार्थिनींना आपल्या व्याख्यानातून समुपदेशन केले.
आधी भविष्यासाठी आपल्या करीयरला महत्व दिले पाहिजे, मगच तुम्ही इतर गोष्टीकडे लक्ष द्या, असा मोलाचे मार्गदर्शन त्यांनी मुलींना केले. तसेच अभ्यासाबरोबरच परमेश्वरला विसरता कामा नये, प्रतिदिनी प्रार्थना केली पाहिजे, आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचा विसर होता कामा नये, त्याचा आदर केलाच पाहिजे हे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितले. मुलींचे स्वसंरक्षण कसे महत्वाचे आहे, हे त्यांनी लक्षात आणून दिले. किशोर वयात येणाऱ्या समस्या याविषयी सुद्धा सांगोपांग चर्चा केली. त्या म्हणाल्या की, संसार रुपी सागरात जन्मदात्या आई-वडील मुलींना जिवापर प्रेम लावून त्यांना लहानाचे मोठे करीत असतात. मात्र काही वेळा (अपवाद वगळता) अलीकडे बऱ्याच मुली आई वडील याचा विचारला मूठ माती देऊन घरा बाहेर काढता पाय घेत असतात, हे बरे नाही. याबाबत आई-वडीलच आपल्या करिअरचा विचार करतील, असे सांगितले. यावेळी काही मुलींनी एकांकिका सादर करून मनोरंजन सुद्धा केले. याप्रसंगी शिक्षिका व माता पालक यांच्यासह विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या.