जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | “या भागाच्या आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कार्यरत राहणार असून, आपल्या गावाच्या विकासासाठी कोणतीही कमतरता भासू देणार नाही असे सांगून जनतेने नेहमीच जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य दिले आहे. असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
पिलखेड ग्रामस्थांच्या वतीने भव्य नागरी सत्कार आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या ‘ रंगतरंग ‘ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला. त्या प्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी शेख खलील, जितेद्र चिचोले, केद्रप्रमुख विनोद चव्हाण सरपंच रोहिणी साळुंखे, पोपा. तेजल चौधरी,उपसरपंच पूनम चौधरी, ग्रा.पं. सदस्य योगराज भालेराव, सुनील कोळी, कविता चौधरी, अमोल चौधरी, समाधान सपकाळे, भारती साळुंखे, मंगला सोनवणे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना उद्देशून पालकमंत्री म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारा “रंगतरंग” हा कार्यक्रम म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे, तर त्यांच्या सर्वांगीण विकासाचा महत्वपूर्ण मंच आहे.
या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. यावेळी पिलखेडे ग्रामस्थ ग्रामपंचायत,शाळा प्रशासन,विविध सामाजिक संस्था, विविध कार्यकारी सोसायटी यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचा शाल, श्रीफळ व मंत्री गुलाबराव पाटील भव्य नागरी सत्कार केला. शाळेचा झाला गौरव मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत नाशिक विभागात पिलखेडे गावाला तृतीय पारितोषिक मिळाल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंदांना अकरा लाखाचा धनादेश व ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन उपशिक्षिका मनीषा मारकड यांनी केले तर आभार उपशिक्षक शरद राजहंस यांनी मानले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जितेंद्र साळुंखे, संजय साळुखे, पोलीस पाटील सौ. तेजल चौधरी, वि.का.चे चेअरमन जगन्नाथ चौधरी, माजी सभापती मुकुंदराव नन्नवरे, गजानन सोनवणे , जितू पाटील, संचालक विठ्ठल पाटील, देविदास चौधरी, प्रकाश चौधरी, आनंदा चौधरी अनिल चौधरी , विठ्ठल कोळी, बंडू साळुंखे, शोभाबाई चौधरी, कल्पना चौधरी राजेद्र चौधरी, किरण चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.