Home Cities जामनेर जामनेर येथे पोलीस ठाण्याचे नवीन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन (व्हिडीओ)

जामनेर येथे पोलीस ठाण्याचे नवीन इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन (व्हिडीओ)


जामनेर प्रतिनिधी ।  शहरातील मध्यभागी जामनेर पोलीस स्टेशनसाठी अद्यावत नवीन इमारत बांधण्यात आले असून त्याचे बुधवार रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

 

यावेळी माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, नगराध्यक्ष साधना महाजन, उपपोलिस अधीक्षक चाळीसगाव विभाग रमेश चोपडे,  पाचोरा उपविभागीय अधिकारी भारत काकडे, तहसीलदार अरुण शेवाळे, पोलीस निरीक्षक किरण शिंदे, नगरपालिका मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, पोलीस उपनिरीक्षक दीपक मोहिते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

युती शासनाच्या काळामध्ये आमदार गिरीश महाजन यांच्या प्रयत्नातून जामनेर येथे पोलीस स्टेशनसाठी नवीन इमारत मंजूर झाली होती. त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण करण्यात आले आहे. प्रसंगी आमदार गिरीश महाजन यांनी पालकमंत्र्यांनी यांच्याकडे पोलीस स्टेशनसाठी फर्निचर व पोलीस कर्मचाऱ्यांच्या रहिवास कॉलनी नवीन करण्यात साठी प्रयत्न करावे, अशी मागणी  केली.

 

यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी फर्निचरसाठी निधी उपलब्ध केला जाणार असून येणाऱ्या काळात जीर्ण झालेल्या जामनेर येथील पोलिस कर्मचाऱ्यांच्या कॉलनी नवीन करण्यासाठी प्रस्ताव दाखल करणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली. पोलीस स्टेशन इमारत कार्यक्रम कोरोना महामारी असल्यामुळे छोटेखानी पार कार्यक्रम समारोप झाल्यानंतर माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या वाहनांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील बसून केले व चहापान घेतला या वेळी शहरात एकच चर्चा रंगली होती.


Protected Content

Play sound