ग.स.सोसायटी निवडणुक – जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया संपन्न

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ग.स.सोसायटी या जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी असलेल्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया आज पार पडली.

आज गुरुवार, दि.२८ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्यातील १५ मतदान केंद्रावर सकाळी ८ ते ४ वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. यात २१ जागांसाठी ११५ उमेदवार रिंगणात असून जळगाव शहरातील प.न.लुंकड कन्या शाळा या केंद्रासह जिल्ह्यातील १५ केंद्रांवर ३२ हजार ४४ मतदानापैकी २५ हजार ३९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीसाठी सरासरी ७९ टक्के मतदान झाले आहे.

जळगाव शहरातील प.न.लुंकड कन्या शाळा या केंद्रावर सकाळी ८ वाजेपासूनच मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविण्यास सुरुवात केली होती. काही केंद्रांवर दुपारी २ वाजेनंतर गर्दी वाढली. दुपारी ३  वाजेच्या सुमारास मतदान केंद्राच्या बाहेर पैसे वाटपाच्या संशयावरुन एका तरुणाला काहींनी हटकल्याने केंद्राच्या आवारात राडा झाला.या गोंधळाच्या वातावरणामुळे अर्धा तणावाची परिस्थिती  निर्माण झाली होती. घटनास्थळी पोलीस दाखल  झाल्यानंतर त्या तरुणाला बाहेर काढले आणि मतदान केंदात मतदान प्रक्र्रिया पुन्हा सुरळीत झाली. मात्र, काही मतदार उन्हामुळे ३ वाजेनंतर आल्याने गेटमध्ये राहिलेल्या मतदारांनी उशिराने ६ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला. तर या गोंधळामुळे काहींना मतदानाचा हक्क न बजावताच काढता पाय घेतला.दरम्यान, गुरुवारी २१ जागांसाठी ३२ हजार ४४ मतदानापैकी २५ हजार ३९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे  ११५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

शनिवारी होणार मतमोजणी –

ग.स.सोसायटीच्या निवडणुकीच्या २१ जागांसाठी  लोकमान्य (संस्थापक प्रगती) गट, सहकार गट, लोकसहकार ,प्रगती शिक्षक सेना, स्वराज्य पॅनल यांच्यासह अपक्ष उमेदवार असे एकूण ११५ उमेदवार रिंगणात आहे. त्यांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले असून दि. ३० रोजी साकलक्ष ८ वाजता कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या हॉलच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे, अशी माहिती सहकार निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई यांनी दिली.

 

तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी –

 

जळगाव – 5160

चाळीसगाव – 2535

भुसावळ – 1112

अमळनेर –  2429

बोदवड – 444

भडगाव – 1159

चोपडा – 2062

धरणगाव –  1031

एरंडोल – 1072

जामनेर – 1705

मुक्ताईनगर – 697

पाचोरा – 1669

पारोळा – 1508

रावेर – 1575

यावल – 1232

Protected Content