Home Cities यावल बामणोद-हंबर्डी रस्त्याचे भूमिपूजन उत्साहात ; आमदार अमोल जावळेंचा पुढाकार

बामणोद-हंबर्डी रस्त्याचे भूमिपूजन उत्साहात ; आमदार अमोल जावळेंचा पुढाकार

0
167

बामणोद – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या बामणोद–हंबर्डी या महत्त्वाच्या ग्रामीण रस्त्याच्या विकासकामाचे भूमिपूजन आज दिमाखात पार पडले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच “सेवा पंधरवडा”च्या पहिल्या दिवशी या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. या सोहळ्याच्या निमित्ताने स्थानिक ग्रामस्थांनी आपल्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला आज अखेर पूर्णविराम दिला.

या रस्त्याची अवस्था गेल्या काही काळात अत्यंत खराब झाली होती. मोठमोठे खड्डे, खराब पृष्ठभाग आणि वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या अडचणींमुळे ग्रामस्थांना दैनंदिन प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः शेतमाल वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे बामणोद ते हंबर्डी हा मार्ग केवळ ग्रामीण नव्हे तर आर्थिक दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता. आता या रस्त्याच्या विकासामुळे संपूर्ण परिसरातील जनजीवन सुलभ होणार आहे आणि रस्ता ग्रामस्थांसाठी जीवनवाहिनी ठरणार आहे.

या विकास कामासाठी आमदार अमोल जावळे यांनी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या कामासाठी आवश्यक निधी मंजूर झाला आणि भूमिपूजनाचा हा ऐतिहासिक क्षण साकार झाला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ग्रामस्थ, महिला, युवक आणि स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामस्थांमध्ये या रस्त्याच्या भूमिपूजनामुळे आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण होते.

या सोहळ्याला हिरालाल चौधरी, शरददादा महाजन, प्रभाकर सोनावणे, डॉ. नरेंद्र कोल्हे, भरत महाजन, डॉ. जे. डी. भंगाळे, नितीन चौधरी, प्रभाकर सरोदे, आलिशान तडवी, पिंटू तेली, योगराज बऱ्हाटे, उमेश पाटील, नारायण चौधरी, दीपक चौधरी, सागर कोळी, उमेश बेंडाळे, गुणवंत निळ, अमोल वारके, प्रशांत सरोदे, जयश्री चौधरी, लता मेढे, पूजा पाटील, डालू चौधरी, भरत पाटील, ज्ञानेश्वर तायडे, सुपडू नेहते, मच्छिन्द्र चौधरी, चंद्रकांत तळेले, अनंता फेगडे, अण्णा भोळे, कुणाल सोनावणे, प्रकाश वाघुळदे, युवराज सोनावणे, नरेंद्र चौधरी, सतीश चौधरी, सुनील चौधरी यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

“प्रत्येक सामान्य नागरिकाला दिलासा मिळावा आणि ग्रामविकासाला नवी दिशा मिळावी, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे,” असे प्रतिपादन आमदार अमोल जावळे यांनी यावेळी केले. त्यांच्या या भूमिकेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये नवा विश्वास निर्माण झाला आहे.


Protected Content

Play sound