ग्रोक एआय आता मराठीतही उपलब्ध !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे मालक एलन मस्क यांच्या एआय कंपनी xAI ने अलीकडेच ग्रोक हा एआय चॅटबॉट स्वतंत्र अ‍ॅप म्हणून लाँच केला आहे. लाँच होताच हा चॅटबॉट सर्वत्र चर्चेचा विषय बनला असून, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि कंम्प्युटरवर ग्रोक एआय चा मोठा प्रभाव दिसून येत आहे.

ग्रोक एआय सध्या ओपन एआयच्या चॅटजीटीपीआणि गुगलच्या जेमिनी च्या थेट स्पर्धेत आहे. काही दिवसांपूर्वीच एआय क्षेत्रातील दोन मोठे चॅटबॉट्स – चॅटजीपीटीआणि डिपसिक यांच्यातील वादामुळे अनेक देशांनी या चॅटबॉट्सच्या वापरावर तात्पुरती बंदी घातली होती. या परिस्थितीचा फायदा घेत ग्रोक एआय ची लोकप्रियता झपाट्याने वाढत आहे.

ग्रोक एआय मध्ये रिसर्च, इमेज क्रिएशन, कोडिंग, डेटा अ‍ॅनालिसिस यांसारखे अनेक फीचर्स उपलब्ध आहेत. कोणत्याही विषयावरील माहिती मिळवण्यापासून ते एआय जनरेटेड इमेजेस तयार करण्यापर्यंत ग्रोक अनेक सोयी पुरवतो. विशेष म्हणजे, ग्रोक एआय आता मराठीतही उपलब्ध आहे, त्यामुळे युजर्स मराठीतून कोणताही प्रश्न विचारू शकतात आणि त्याचे उत्तरही मराठीत मिळू शकते.

इतर चॅटबॉट्सच्या तुलनेत, ग्रोक एआय अधिक सोयीस्कर आणि अचूक माहिती पुरवतो. त्यामुळे त्याचा युजर बेस झपाट्याने वाढत आहे. एआय जगतात ग्रोक एआयची उपस्थिती दिवसेंदिवस बळकट होत आहे आणि भविष्यात तो ओपनएआयआणि गुगलच्या चॅटबॉट्ससाठी मोठा धोका ठरू शकतो.

Protected Content