अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील क्षत्रिय फुल माळी समाज संस्थेच्या कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष दिनेश माळी,सचिव विजय माळी, सहसचिव संजय खलाणे, तसेच सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. दिलीप पाटील, दिनेश माळी, विजय माळी, संजय खलाणे आदींनी सावित्री माईंच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी ॲड. नागराज माळी, गिरधर महाजन, कैलास महाजन, नानाभाऊ माळी, खेमेश्वर बोरसे, प्रवीण महाजन, एकनाथ पाटील, आर.एस.माळी, निंबा पाटील, भावेश महाजन, हर्षल महाजन, सोमनाथ मराठे आदी समाज बांधव उपस्थित होते.