अमळनेर (प्रतिनिधी) ‘ व्यवस्था परिवर्तनाचा वैचारिक कृतिशील आदर्श तरुणांनी भगतसिंग यांच्या जीवन कार्यातून घ्यावा ‘ असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी केले. शहीद दिनानिमित्त शहरातील आर.के.नगर येथे युवकांनी क्रांतिकारक अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते,
त्यावेळी ते बोलत होते.
युवक मित्रांनी शहीद दिनाच्या निमित्ताने शहीद क्रांतिकारकांचे स्मरण करण्यासाठी अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी क्रांतिकारक भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी रणजित शिंदें यांचेसह आयोजक युवा कार्यकर्ते धिरज पाटील , मंगेश मोरे, शेषनाथ बागुल , अभिषेक पाटील, शुभम पाटील, कल्पेश जगताप, प्रणव पवार, महेश संदनशिव, गणेश परदेशी, अरुण संदानशिव आदींनी पूजन केले.
यावेळी झालेल्या प्रमुख भाषणात भगतसिंग, “सुखदेव, राजगुरू यांनी देशासाठी दिलेले बलिदान हे केवळ भावनिक नव्हते तर ते विचारपूर्वक होते. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिकांच्या अद्वितीय त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी तरुणांनी भावनांच्या आहारी न जाता बुद्धिप्रामाण्यवादी झाले पाहिजे. भांडवलदारांच्या हातचे बाहुले होऊ घातलेल्या व्यवस्थेच्या दलालांच्या विरोधात सविधानात्मक मार्गाने चळवळ चालविण्याची जबाबदारी युवाशक्तीची आहे, असे जाहीर आवाहन यावेळी रणजित शिंदे यांनी उपस्थितांना केले.
याप्रसंगी युवक, महिला, परिसरातील जेष्ठ नागरिक यांनीही भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन केले. परिसरातील प्रतिष्ठित नागरिक श्री.राणे, भैय्या पाटील, संजय शिंपी, प्रविण सातपुते, पिंटू जाधव, योगिता पाटील, संगीता पाटील, शोभाबाई भास्कर जगताप, मिनाबाई पवार, भावना पाटील,
येनुबाई भोई आदिंसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.