Home Cities भुसावळ भुसावळ येथे महात्मा फुले यांना १२९ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

भुसावळ येथे महात्मा फुले यांना १२९ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन


bhusaval fule jayanti

भुसावळ, प्रतिनिधी | शहरातील माळी भवन येथे आज (दि.२८) महात्मा फुले यांना १२९ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माळी समाज मंडळाचे अध्यक्ष कैलास महाजन यांनी म. फुले यांच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाला सुरुवात केली.

 

आपल्या अधक्षिय भाषणात त्यांनी फुले यांच्या कार्याविषयी महिती देऊन त्यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. मंडळाचे सचिव गजेंद्र महाजन यांनीही त्यांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. या वेळी मंडळातील विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच यावेळी फुले दाम्पत्याला भारत रत्न मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी प्रतिज्ञाही सगळ्यांनी केली. यावेळी कैलास बंड, शैलेश माळी, रामकृष्ण माळी, योगेश महाजन, वरूण महाजन, निलेश भोपळे आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound