जळगाव प्रतिनिधी । आद्य समाजसुधारक, समतेचे प्रणेते महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज विनम्र अभिवादन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिजीत राऊत यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, तहसिलदार सुरेश थोरात, सहाय्यक पुरवठा अधिकारी प्रशांत कुलकर्णी यांचेसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.