यावल प्रतिनिधी | कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाद्वारे अभिवादन करण्यात आले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बुधवारी. १२ जानेवारी रोजी सकाळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष व तत्कालीन नगरसेवक अतुल पाटील, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अजय पाटील, पत्रकार डि.बी. पाटील, पत्रकार सुनिल गावडे, प्रगतीशिल शेतकरी प्रमोद यशवंत नेमाडे, मराठा सेवा संघाचे सचिव संतोष पाटील, अॅड. देवकात पाटील, दिनकर शिरसागर, सुरेश पाटील, एन.पी. चौव्हाण, भगवान पाटील, निलेश पाटील आदींची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला अतुल पाटील व अजय पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त करतांना या थोर महान व्यक्तिंच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार अजय पाटील यांनी मानले.
व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3008720366006388