दीपनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील बोरोले लॉन्स येथे महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर व्हॉईस मीडियाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी फोरमचे केंद्रीय सचिव प्रकाश सरदार व जिल्हाध्यक्ष दिनेश ईखारे यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले आणि त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.
यावेळी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉक्टर संजय भटकर, फेकरी गावचे माजी सरपंच राहुल वाघ यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली पत्रकारिता या विषयावर अनमोल मार्गदर्शन केले. प्रकाश सरदार व दिनेश ईखारे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी निंभोरा येथील ठेकेदार रामचंद्र भाऊ तायडे, बी.टी.पी.एस ठेकेदार संघटनेचे अध्यक्ष दीपक हातोले, बोरोले लॉन्स चे संचालक व ठेकेदार उल्हासभाऊ बोरोले,हरून मंन्सूरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती प्रशांत भाऊ निकम यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उ.म.अध्यक्ष प्रकाश तायडे, जिल्हा सचिव रमेश खंडारे , भुसावळ तालुका अध्यक्ष चंद्रशेखर निकम ,संतोष इंगळे,अमोल शेगोकार यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार तालुकाध्यक्ष चंद्रशेखर निकम यांनी मानले.