शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. विलास मालकर यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रमात अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी डॉ. जितेंद्र सुरवाडे, अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. इम्रान पठाण, प्रशासकीय अधिकारी संजय चौधरी, दिलीप मोराणकर, विजय पाटील, जी. एन. गवळी, मंगेश जोशी, किरण बावस्कर, अनिल कापुरे, ज्ञानेश्वर डहाके, नरेश पाटील, निलेश बारी, साहेबराव कुडमेथे, प्रदीप जयस्वाल, उमेश टेकाळे, के. पी. भागवत, गोपाल बहुरे, मनीषा मगरे, कुणाल पाटील, कर्डीले, अभिषेक स्वामी, नरेंद्र वाघ, मोहन पाटील आणि लिलाधर कोळी यांनीही आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना आदराने वंदन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. मराठी पत्रकारितेच्या विकासातील त्यांचे योगदान, समाजसुधारणा व शिक्षण क्षेत्रातील कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. या कार्यक्रमाद्वारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आपल्या जीवनात पत्रकारितेच्या मूल्यांचे महत्त्व जपण्याचा संकल्प केला.

Protected Content